सोलापूर :- महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणा-या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार 2009-10 करिता मातंग समाजातील साहित्यिक, कलावंत, समाजसेवक व सामाजिक संस्थांनी दिनांक 15 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
सदर पुरस्कार मिळविण्यासाठी पात्रता व्यक्तीच्या गत मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. स्वयंसेवी संस्थांसाठी - समाजकल्याण क्षेत्रात मातंग समाजाच्या उन्नतीसाठी, शिक्षण, आरोग्य, अन्याय, अत्याचार निर्मुलन, अंधश्रध्दा निर्मुलन, जनजागरण इ. क्षेत्रात कमीत कमी 10 वर्षे कार्य करणा-या संस्था असाव्यात. संस्था - पब्लिक ट्रस्ट अक्ट, व सोसायटी रजिस्टर अक्ट 1960 खाली पंजीबध्द असावी. तत्संबंधी प्रमाणपत्र सादर करावेत. संस्थेच्या आर्थिक व्यवहार कोणत्याही गैरव्यवहार नसल्याचे प्रमाणपत्र व संस्थेच्या कार्यपक्षातील व राजकारणापासून अलिप्त असल्याचे प्रमाणपत्र. कार्यासंबंधी माहिती व तत्संबंधी कागदपत्र तसेच संस्था कोणते भ्रीव कार्य करते व आतापर्यंत संस्थेने त्यांचे उद्दीष्ट कितपत साध्य केले आहे यासंबंधी अहवाल. संस्थेच्या घटनेची प्रमाणित प्रत व मागील पाच वार्षिक अहवाल आवश्यक राहील. तसेच संस्थेचे प्रतिवर्षी लेखा परिक्षण झालेले असावे. वरील पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती - संस्था यांनी विहीत नमुन्यात अर्ज भरुन त्यासोबत कार्य केल्याचे पुरावे इ. तीन प्रतीत विशेष जिल्हा समाजकल्याण यांचेकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. मुदतीनंतर व विहित नमुन्यात नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, सोलापूर यांचेकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.