बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : द्राक्ष, लिंबू शेवगा इत्यादी प्रकारच्या शेतीमालासाठी पुणे येथील विविध 26 ठिकाणी थेट माल विक्रीसाठी जागा उपलब्ध केल्याची माहिती आर.एस.एम. परिवारातर्फे देण्यात आली.
सदर कामाचा शुभारंभ महाशिवरात्री रोजी होत असून दि. 9 रोजी सकाळी 9 वाजता पार्वती पायथा येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठाण येथून याचा आरंभ होत आहे. या योजनेच्या उद्घाटनासाठी पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते सुभाष जगताप, स्वामी समर्थ प्रतिष्ठाण व राष्ट्रवादी नेते लक्ष्मण जगदाळे, आर.एस.एम. परिवाराचे राजेंद्र मिरगणे, जिल्हा कृषि अधिक्षक गावसाने, खर्चे आदिजण उपस्थित राहणार आहेत.
ज्या शेतकर्यांना आपले शेती उत्पादन पुणे येथील थेट बाजारपेठेत द्यावयाचा असेल त्यांनी आर.एस.एम. परिवारातील कृषि विभागाचे अँड. प्रकाश गुंड यांच्याशी तेलगिरणी चौक येथे किंवा 02184 - 222226, 9922784825 या क्रमांकावर संपर्क साधावा.