बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्‍वविवद्यालय तसेच शहरातील विविध महिला संघटनांच्या सयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 12 मार्च रोजी आध्यात्मिक महिला सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
     या अभियानाचा शुभारंभ दि.12 मार्च रोजी भगवंत मंदिरापासून सोमप्रभाबहनजी यांच्या शुभहस्ते होत शहरातील प्रमुख मार्गावरुन लिंगायत बोर्डिंग येथे अभियानाचा समारोप होणार आहे.
     या अभियानात कलश घेतलेल्या महिला, महिलांच्या सुरक्षेचे महत्व सांगणारी प्रात्यक्षिके, ऐतिहासिक व पौराणिक विशेष महिलांचा देखावा याचे आयोजन केले आहे. सायंकाळी सहा वाजता आमदार दिलीप सोपल, रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापक सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्कार दायिनी परिवाराचा महिला सुरक्षेसाठीच्या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ होत आहे. यावेळी ब्रह्मकुमारी सरिताबहनजी हे महिलांच्या सुरक्षेसाठी संस्काराच्या माध्यमातून चरित्र निर्माण या विषयावर बोलणार आहेत. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून अनेक महिला संघटनांचे पदाधिकारी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
 
Top