बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी शहरातील उद्योग व व्यापाराचा पूर्वी प्रमाणेच नावलौकिक होण्यासाठी खाजगी तत्वावरील कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केल्याचे तसेच पणन खात्याने हिरवा कंदील दिल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेस पंचायत समितीचे उपसभापती केशव घोगरे, नगरसेवक अशोक बोकेफोडे, दिपक राऊत, महेदिमियॉं लांडगे आदि उपस्थित होते. याकरिता लक्ष्मी सोपान अँग्रो प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी प्रणाची च्या नावाने खाजगी समुहाची स्थापना केली असून जामगाव रोडवरील पूजा हॉटेलच्या पाठीमागील बाजूस याचे कामकाज प्रगतीपथावर आहे. सदरच्या प्रकल्पासाठी नियमानुसार किमान पाच एकरचे क्षेत्र आवश्यक असून आपण त्यासाठी 15 एकरचे मोठे क्षेत्र उपलब्ध करुन दिले आहे. यात कडधान्ये, तेलबिया, शेतीमाल, फळांचा बाजार, कडबा बाजार, जनावरांचा बाजार इत्यादी सर्वप्रकारच्या मालासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण क्षेत्राला कुंपन भिंत तसेच अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाले असून लिलाव शेड, वजन काटा,गोदामे, व्यापारी गाळे, विजेची व्यवस्था, पिण्याचे व जनावरांच्या पाणीची सुविधा हमाल व शेतकरी निवास इत्यादी प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी नगररचना विभाग, नगरपालिका, जिल्हाधिकारी आदि प्रकारच्या सह पणन विभागाकडून रितसर मान्यता मिळाली आहे. व्यापारी गाळ्यासंदर्भात बांधकामाचे 80 गाळांचे तीन टप्पे केले असून प्रत्येक गाळा हा 20 बाय 60 फूट क्षेत्राचा देण्यात येणार आहे. त्यांच्या मागणीनुसार व्यापार्यांना उपलब्ध करण्यात येतील. येणार्या दसर्याला व्यापारी आपला व्यवसायाचा शुभारंभ करता यावा याकरिता तातडीने कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.
पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, आजपर्यंत खुनशी राजकारण करुन काही व्यापार्यांची लायसन रिनीव्ह झाली नाहीत, व्यापार्यांच्या दुकानाची नावे खोडायला लावली परंतु आपण व्यापारात कसलेही राजकारण न करता प्रत्येक व्यापार्यांना कसल्याही प्रकारचा धोका अथवा त्रासाशिवाय शांततेत व्यापार करण्यासाठी तसेच नवनवीन व्यापार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या बार्शीचे व्यापाराचे पूर्वीचे वैभव प्राप्त करुन चांगल्या प्रकारचे नाव होण्यासाठी या बाजार समितीमध्ये धान्य स्वच्छ करण्याच्या तीन मशीन, वजनकाटा इत्यादी सर्व सुविधांनी शेतकर्यांच्या मालाला जादा दर मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.