उस्‍मानाबाद -: महाराष्‍ट्र शासनाने गावात तंटे निर्माण होऊ नयेत तसेच दाखल असलेले तंटे व नव्‍याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिटविण्‍याची व्‍यवस्‍था निर्माण व्‍हावी आणि सामाजिक शांतता प्रस्‍थापित होवून राज्‍याची शांततेतून समृध्‍दीकडे वाटचाल व्‍हावी, या दृष्‍टीने दि. 15 ऑगस्‍ट 2007 पासून महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहीम राज्‍यात सुरु करण्‍यात आलेली आहे. सन 2011-12 मध्‍ये उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील 63 गावे तंटामुक्‍त गाव म्‍हणून घोषित करण्‍यात आले असून सदरील गावांची शांतता पुरस्‍कारासाठी निवड झालेली आहे. त्‍यातील दोन गावे विशेष शांतता पुरस्‍कारासाठी प्राप्‍त ठरलेली आहे.
    उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिमेंतर्गत जास्‍तीत जास्‍त गावे तंटामुक्‍त करण्‍यासाठी जिल्‍हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक कार्यालयातील तंटामुक्‍त सेलचे सहाय्यक पोलीस फौजदार नंदकुमार कदम, विशाल राजेश्वरकर, नाईकवाडी आणि जिल्‍ह्यातील पोलीस ठाण्‍याचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील तंटामुक्‍त समितीचे अध्‍यक्ष व पदाधिकारी यांनी जिल्‍ह्यातील जास्‍तीत जास्‍त गावे तंटामुक्‍त होण्‍यासाठी प्रयत्‍न केलेले आहेत.
    उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील 63 गावे तंटामुक्‍त गाव म्‍हणून घोषित करण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक पात्र गावास लोकसंख्‍येनुसार बक्षीस देण्‍यात येणार आहे. तंटामुक्‍त गाव म्‍हणून घोषित करण्‍यात आलेली गावे पुढीलप्रमाणे असून कंसात त्‍या गावास मिळालेली बक्षीसाची रक्‍कम आहे.
        उस्‍मानाबाद तालुक्‍यातील मेंढा (3 लाख रूपये), टाकळी बे (4 लाख रूपये), लासोना (4 लाख रूपये), समुद्रवाणी (4 लाख रूपये), घुगी (4 लाख रूपये), तर तुळजापूर तालुक्‍यातील काक्रंबा (5 लाख रूपये), वाणेगाव (2 लाख रूपये), आरबळी (2 लाख रूपये), खुदावाडी (5 लाख रूपये), सलगरा दि (5 लाख रूपये), गंधोरा (4 लाख रूपये), वडगाव देव (2 लाख रूपये), उमरगा तालुक्‍यातील नाईचाकुर (5 लाख रूपये), एकुरगा (5 लाख रूपये), माडज (7 लाख रूपये), मुळज (7 लाख रूपये), मातोळा (1 लाख रूपये), मळगीवाडी (2 लाख रूपये), कुन्‍हाळी (4 लाख रूपये), कोराळ (3 लाख रूपये), आलुर (7 लाख रूपये), दस्‍तापुर (2 लाख रूपये), आष्‍टाकासार (7 लाख रूपये), बेळंब (4 लाख रूपये), दाळींब (7 लाख रूपये), लोहारा तालुक्‍यातील पेठसांगवी (5 लाख रूपये), तोरंबा (3 लाख रूपये), सास्‍तुर (7 लाख रूपये), लोहारा खु (2 लाख रूपये), करवंजी (2 लाख रूपये), धानुरी (4 लाख रूपये), समुद्राळ (2 लाख रूपये), परंडा तालुक्‍यातील खासापुरी (2 लाख रूपये), खानापूर (2 लाख रूपये),  घारगाव (2 लाख रूपये), तर भूम तालुक्‍यातील वारेवडगाव (2 लाख 50 हजार रूपये), गोरमाळा (1 लाख रूपये), उमाचीवाडी (1 लाख रूपये), बागलवाडी (1 लाख रूपये), मात्रेवाडी (1 लाख रूपये), ईराचीवाडी (1 लाख रूपये), उळुप (2 लाख रूपये), वाल्‍हा/सामनगाव (2 लाख रूपये), राळेसांगवी (2 लाख रूपये), दुधोडी (1 लाख रूपये), वडाची वाडी (1 लाख रूपये), जांब (2 लाख रूपये), नान्‍नजवाडी (1 लाख रूपये), ब-हाणपूर (1 लाख रूपये), तसेच वाशी तालुक्‍यातील चांदवड (1 लाख रूपये), ब्रम्‍हगाव (2 लाख रूपये), फक्राबाद (1 लाख रूपये), तेरखेडा (7 लाख रूपये), शेलगाव दि (2 लाख रूपये), दुधाळवाडी (1 लाख रूपये), पिंपळगाव डो. (2 लाख रूपये), सात्रा (2 लाख रूपये), जायफळ (2 लाख रूपये), बोरगाव खु. (2 लाख रूपये), पाडोळी (4 लाख रूपये), पाडोळी (4 लाख रूपये), नायगाव (7 लाख रूपये), घारगाव (3 लाख रूपये), निपाणी (3 लाख रूपये) असे एकूण 63 गावांचा या पुरस्‍कारासाठी निवड करण्‍यात आला असून सुमारे 1 कोटी 94 लाख 50 हजार रूपये एवढे रक्‍कमरूपी बक्षीसे 63 गावांना मिळणार आहेत. तर एकुरगा (ता. उमरगा), वारेवडगाव (ता. भूम) हे दोन गावे विशेष शांतता पुरस्‍कारासाठी प्राप्‍त ठरलेली आहे.

 
Top