उस्मानाबाद -: कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, मुलीची छेडछाड व कामाच्या ठिकाणी होणा-या महिलांच्या लैगिक छळ अशा घटना अशोभनीय आहेत. महिलांना संरक्षण देऊन अशा घटना रोखण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
येथील पुष्पक मंगल कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (8 मार्च) महाराष्ट्र राज्यग्रामीण जीवनोन्नती अभियान व निर्मल भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा विधी प्रधिकरण आणि माविम यांच्या सहयोगाने महिलांच्या विविध विषयावर चर्चासत्र व सक्षमीकरण जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राणाजगजितसिंह पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार बसवराज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती पंडित जोकार, समाजकल्याण सभापती दगडू धावारे, महिला व बालकल्याण सभापती सविता कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, प्रकल्प संचालक डॉ.केशव सांगळे, प्रा. सुनिता चावला-रेणके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, महिलांचे राजकारणात फार मोठे योगदानआहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण तर इंदिरा गांधी यांनी चांगले राज्य चालवून महिला सक्षमीकरण करण्यासाठी योग्य दिशा दिली. त्या दिशेने महिलांनी पुढे यावे यासाठी शासन आपल्या पाठीशी आहे. शासनाने महिलांच्या आर्थीक, सामाजिक आणि शैक्षणीक उन्नतीसाठी आरक्षणात भरीव वाढ केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींना स्वसरंक्षणासाठी कराटे प्रशिक्षण मंजूरी कामासाठी आम्ही पाठपुरावा करु, असे सांगून ते पुढे म्हणाले की, महिला बचतगटांनी लघु उद्योग चालू केले आहेत आणि ते यशस्वी होत आहेत. त्यांच्या उत्पादित मालाला योग्य ती बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करु. तसेच महिलांनी एकत्र येऊन महिला बँकेची उभारणी केल्यास त्यांना योग्य ते सहकार्य केले जाईल.
आ .राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, महिला सक्षम होणे ही काळाची गरज आहे. महिलांमध्ये अत्याचाराला शाररिकदृष्टया प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आली पाहिजे. महिलांना मल्टीस्टेट बँक उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. महिलांसाठीच्या योजना व हक्क समजावून घेऊन संधीचा फायदा घ्यावा,असे सांगितले.
आमदार बसवराज पाटील यांनी सांगितले की, महिलांकडे स्त्री शक्ती म्हणून पाहिले जाते. ही स्त्री शक्ती जोपासण्याची जबाबदारी समाजावर आहे. सार्वजनिक जीवन चांगले जगण्याची व प्रगती करण्यासाठी समन्वय व चांगले संस्कार निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.व्हट्टे म्हणाले की, महिलांच्या सामाजिक, आर्थीक प्रगतीसाठी व्यापक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. महिलांना सक्षम करुन न्याय देणे, त्यांची प्रतिष्ठा व हक्क्त्यांना मिळाली पाहिजे. त्यामुळे महिला सक्षमीकरण महत्वाचे आहे.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती सविता कोरे यांनी मुला-मुलींमधील भेदभाव थांबला पाहिजे. प्रत्येक पुरुषांच्या यशामागे एक स्त्री असते, याचे महत्व पटवून देऊन महिलांवर आधारित कविता सादर केली .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित मेळावा, महिला सक्षमीकरण व चर्चासत्रामागील भूमिका स्पष्ट केली.

* क्षणचित्रे *
महिला मेळाव्यातील विषय व मार्गदर्शक पुढीलप्रमाणे:
* पाणी व स्वच्छतेत महिलांचा सहभाग -प्रा.सुनिता चावला-रेणके, स्त्री गर्भलिंग निदान चाचणीचा गैरवापर-अँड.उमा गंगणे, हुंडा प्रतिबंध कायदा व महिलांचे अधिकार, बालविवाह- अँड. आरती आबूज, तर महिला कायदे विषयक मनोगत - जिल्हा व सत्र न्यायाधीश शशीकांत कुलकर्णी यांनी केले.
* सप्तसंगी शिंपले या लहान मुलीने महिला मेळाव्यात 10 मिनीटे भाषण केल्याबद्दल पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
* प्रा.सुनिता चावला-रेणके यांनी सर्वांना महिला दिनानिमित्त शपथेचे वाचन करुन शपथ दिली.
* सुरुवातीस पालकमंत्री चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुषपहार व दीप प्रजवलन करुन उदघाटन केले.
या मेळाव्यास पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व पंचायत समिती सदस्य, बचतगटातील महिला व संबंधित खातेप्रमुखांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रमाकांत गायकवाड यांनी तर डॉ.केशव सांगळे यांनी आभार मानले.