सोलापूर -: मातंग समाजाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे यांच्या मार्फत दि. 24 मार्च 13 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत महाराष्ट्र राज्य संघ, 4/5 बिज्जे रोड, पुणे-1 येथे सहकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून या प्रशिक्षणाकरिता मातंग समाज व पोटजातीतील महिला व पुरुषांची प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे.
    सदरच्या प्रशिक्षणाच्या वेळी चहा व एकवेळचे जवेणाची सोय करण्यात येईल. प्रशिक्षणार्थींनी येण्याजाण्याचा खर्च स्वत: करावा लागेल. तरी सहाकर क्षेत्राची आवड असणा-या स्त्री व पुरुषांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
    प्रशिक्षणास इच्छु असणा-यांनी जिल्हा कार्यालय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) सोलापूर येथे नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सोलापूर दूरध्वनी क्र. 0217-231523 प्रादेशिक कार्यालय, पुणे 020-26134154 या दुरध्वनी क्रमांकवर संपर्क साधवा.
 
Top