बीड -: मराठवाड्यात आज पत्रकारांवरील हल्ल्याच्या दोन घटना घडल्या बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील पत्रकार कृष्णा देशमुख यांच्या वर आज सकाळी घरात घुसून हल्ला करण्यात आला. उमापूर परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सूळसुळाट अशी बातमी त्यांनी आज 'युवा चाणक्य ' या दैनिकात छापली होती.त्यावरून हा हल्ला करण्यात आला.देशमुख यांना गेवराई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
         दुसरी घटना गंगाखेड येथे घडली .गंगाधर कांबळे यांनी रोजगार हमी ची कामे जे.सी.पी यंत्र द्वारे अशी बातमी छापली होती, त्यातून पंचायत समितीच्या एका पदाधिका-च्या पतीने कांबळे यांच्यावर हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी कांबळे यांच्या विरोधातच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी निषेध केला आहे.
      दरम्यान प्रेस कौन्सिलच्या एका पथकाने पूर्णा येथे जाऊन दिनेश चौधरी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
 
* सौजन्‍य उद्याचा बातमीदार

 
Top