सांगोला (राजेंद्र यादव) :- सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते कार्यतपस्वी आ. काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवार दि. 28 मार्च रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. रामराजे निंबाळकर व पालकमंत्री ना. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या शुभहस्ते म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील यांनी दिली.
         सांगोला तालुक्यात सलग तीन वर्षापासून अपुर्‍या पावसाने शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईमुळे नियोजन बिघडले आहे. तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन, सांगोला उपसा सिंचन (उजनी) व निरा योजना या चार मुख्य पाण्याच्या योजनेवर शेतीच्या पाण्याची मदार अवलंबून आहे. परंतू गेल्या अनेक वर्षापासून पुरेशा निधीअभावी यातील टेंभू. म्हैसाळ उपसा सिंचन योजना रखडल्या आहेत तर उजनी धरणातून सांगोला उपसा सिंचन योजनेच्या दोन टी.एम.सी पाणी कामाच्या निविदा काढल्या आहेत. या उपसा सिंचन योजनेचे या.शरद पवार व विलासराव देख या दोन मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले मात्र अजूनही कामे सुरू झाली नाहीत. या योजनेसाठी 100 कोटी रू. ची आवश्यकता असताना चालू अर्थसंकल्पायध्ये फक्त 10 कोटी रू.तरतूद केली असल्याने या योजना भविष्यात रेंगाळणार की काय याबाबत संभ्रम आहे तालुक्याची टंचाई स्थिती पाहाता गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार सांगोला येथे आले असता पिण्याची पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यातील कोसारी कालव्यातून सिंगनहळ्ळी येथील कोल्हापुर पध्दतीच्या बंधार्‍यात सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार दि.25 यार्च रोजी म्हैसाळ सिंचन योजनेवरील 25 पंपापैकी सद्या 18 पंप सुरू केले आहेत. या 18 पंपामधून 100 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. कासलिंगवाडी येथे सध्या हे पाणी सांगोला हदीपासून 6 कि.मी अंतरावर आल्याचे समजते.
          येत्या दि. 28 मार्च जलसंपदा मंत्री ना. रामराजे निंबाळकर, पालकमंत्री ना. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या शुभहस्ते व आ. गणपतराव देशमुख, आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या उपस्थितीत म्हैशाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्यातील कोरडा नदीत सोडण्यात येणार आहे. म्हैशाळच्या पाण्यातून कोरडा नदीवरील वाढेगाव हद्दीपर्यंत 15 बंधारे पाण्याने भरुन घेणार आहेत. शिवाय या पाण्यातून गळवेवाडी, सोनंद, जवळा, कडलास, आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव या भागातील शेतकर्‍याना फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
 
Top