सांगोला (राजेंद्र यादव) -: तालुक्यात भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या टंचाई अंतर्गत सुमारे १३ कोटी २७ लाख रूपये मंजूर निधीतून ओढय़ा नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या १३१ पैकी ६0 सिमेंट नाला बंधार्‍यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरीत ७१ बंधार्‍यांची कामे प्रगतीपथावर असून पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण करून घेण्यासाठी अधिकारी कर्मचार्‍यांमार्फत युद्धपातळीवर प्रय▪सुरू असल्याची माहिती लघुपाटबंधारे उपविभागीय अधिकारी डी.व्ही. मंटूर यांनी दिली आहे.
          सांगोला तालुक्यात सलग तीन वर्षे पुरेसा पाऊस न पडल्यामुळे ओढे, नाले तलाव व नदीवरील बंधारे पाण्याअभावी कोरडे ठणठणीत पडले आहेत तर पावसाळ्यात तालुक्यातून गावोगावच्या वाहणार्‍या ओढय़ा, नाल्यातून पावसाचे पाणी अडविले जात नसल्यामुळे कधी नव्हे ते पाण्याची पातळी अत्यंत खोलवर गेल्यामुळे चालूवर्षी पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील पाण्याचे दुर्भिक्ष व जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आ. गणपतराव देशमुख, आ. दीपक साळुंखे-पाटील, अँड़ शहाजी पाटील यांनी केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांच्याकडे जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणात हाती घेण्यासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी केली होती. राज्य शासनाने टंचाई निवारण अंतर्गत तालुक्यातील नाल्यावर सिमेंट बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहिम सक्षमपणे राबविण्यासाठी सन २0१२ मध्ये तालुक्यातील ओढय़ा नाल्यावर सिमेंट नाला बंधारे बांधण्यासाठी सुमारे १३ कोटी २७ लाख रूपयाचा विशेष निधी तात्काळ मंजूर केला होता. लघुपाटबंधारे स्थानिक स्तर विभाग सोलापूर अंतर्गत लघुपाटबंधारे स्थानिक स्तर उपविभाग क्र. १ सांगोला मार्फत तालुक्यातील चाळीस गांवामध्ये व वाडीवस्तीवरील ओढय़ा नाल्यावर १३१ सिमेंट बंधार्‍यांची कामे हाती घेतली आहेत. ओढय़ा नाल्यावर एक सिमेंट बंधारा बांधण्यासाठी अंदाजे १0 ते १२ लाख रूपयांचा निधी खर्ची पडणार आहे. तालुक्यात सुरू असलेल्या १३१ पैकी ६0 सिमेंट बंधार्‍याची कामे पूर्ण करण्यात आली असून ६८ बंधार्‍यांची कामे प्रगतीपथावर आहेत. तर तीन ठिकाणी शेतकर्‍यांच्या विरोधामुळे बंधार्‍याची कामे सुरू करण्यात आली नाहीत.
       यामध्ये कोळा, जुनोनी, सोनंद, तरंगेवाडी, भोपसेवाडी, वाणीचिंचाळे, वाकी-घेरडी, हंगीरगे, डिकसळ या ठिकाणीच्या वाडी वस्तीवरील ओढय़ा नाल्यावर बंधार्‍याची कामे मोठय़ा प्रमाणात हाती घेतली आहेत. दि. ३१ मार्च २0१३ अखेर मंजूर निधीतील १३१ बंधार्‍यांची कामे पूर्ण करून घेण्यासाठी ठेकेदारांना सक्त सूचना केल्या आहेत.
    
 
Top