बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी नगरपरिषदेतील वर्षभर सुरु असलेल्या तक्रार निवारण केंद्रात संपूर्ण वर्षभरात नागरिकांच्या आलेल्या सर्व 650 तक्रारींची सोडवणूक केल्याची माहिती केंद्रवाह अमर नागटिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
     आमदार दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल, मनीष चौहान आदि उपस्थित होते.
     अनेक अशिक्षित अथवा गरजू लोकांची कामे करतांना कर्मचार्‍यांकडून वेळेत दखल न घेतल्याच्या तसेच कामेच होत नसल्याच्या तक्रारीवर ठोस उपाय म्हणून दिलीप सोपल यांच्या मार्गदर्श़नाखाली बार्शी नगरपरिषदेत तक्रार निवारण केंद्राची निर्मिती करण्यात आली. याचा बार्शीतील सामान्य लोकांना चांगला फायदा झाल्याचे मागील वर्षभरातील कामकाजावरुन दिसून येते.
     दिलीप सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने बार्शी नगरपरिषदेची एकहाती सत्‍ता मिळविली. लोकांनी ठेवलेल्या विश्वासामुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने आ. सोपल यांच्या विचाराने नागरिकांच्या दैनंदिन तक्रारीसाठी दि. 7 मार्च 2012 पासून स्वतंत्र कक्षाची स्थापन करण्यात आली. 
     बार्शी नगरपरिषदेमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी अशा प्रकारचा राबिवण्यात आलेला हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. दररोज सकाळी 11 ते 5 या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत नगरपरिषेच्या एका खोलीत सर्व विभागाच्या कामासंबंधीच्या तक्रारी नोंद केल्या जातात. किरकोळ तक्रारीचे जागच्या जागी निपटारा करुन लोकांना हसत मुखाने पाठविले जाते तर केवळ वेळ खाऊ कामासंबंधींची नोंद घेऊन त्यांचे काम 3 ते 7 दिवसात करुन संबंधीत व्यक्तींना फोन करुन निपटारा झाल्याची खात्री केली जाते. अशा प्रकारच्या लोकोपयोगी उपक्रमाच्या यशानंतर शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या पंचायत समितीमधील कामकाजासंबंधी अशाच प्रकारचे तक्रार निवारण केंद्रउभारण्यात येणार असल्याचे आङ्कदार िदलीप सोपल यांनी म्हटले.
 
Top