उस्मानाबाद जिल्हा तसा दुष्काळग्रस्त म्हणूनच ओळखला जातो. यावर्षी झालेल्या अपु-या पावसाने तर जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्याबाबतच्या अडचणीत अधिकच भर पडली. यातच जिल्हाधिकारी डॉ .के. एम. नागरगोजे यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. पदभार हाती घेतल्यानंतर काही महिन्यातच त्यांना या पाणीटंचाई नियोजनासाठी युध्दपातळीवर मुकाबला करावा लागला.
जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी डॉ. नागरगोजे यांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक म्हणून जबाबदारी अतिशय समर्थरित्या सांभाळली होती. तेथील अनुभव त्यांनी उस्मानाबाद येथे पुरेपुर उपयोगात आणला. अतिशय शांतपणे प्रश्न समजावून घेवून त्यावर समोरच्यांचे समाधान होईल, अशा पध्दतीने मार्गदर्शन करणे हे त्यांचे वैशिष्ठय. एकवेळा नाही, अनेकवेळा एखाद्या गोष्टीचे महत्व अधोरेखित केले की, पुढील माणूसही त्यानुसार अंमलबजावणीसाठी उद्युक्त होतो, हा त्यांचा प्रशासकीय कामकाजातील अनुभव येथे उपयोगात येतो.
पाण्याची टंचाई जाणवणार हे लक्षात येताच डॉ. नागरगोजे यांनी उपलब्ध प्रत्येक व्यासपीठाचा वापर हा पाणीबचतीचे महत्व सांगण्यासाठी केला. पाणी बचत, पाणी पुनर्वापर हा त्यांचा परवलीचा शब्द आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगात आणला गेला पाहिजे. तो वाया जाऊ नये, यासाठी त्यांची धडपड आहे. पाऊस कमी झाला, पाण्याचे स्त्रोत आटले, आता नवीन स्त्रोत शोधण्यासाठी गावकऱ्यांइतकाच त्यांचा स्वत:चा प्रयत्न राहिला आहे.
पाणीबचतीबाबत जागृती व्हावे यासाठी राज्यातील विविध भागात पाणीबचत व पाणी पुनर्वापराबाबत झालेले प्रयोग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध गावांतील नागरीकांना कळावेत, यासाठी त्यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजारची कहाणी, चेन्नई येथील रेन सेंटरचे काम आणि आपल्याच जिल्ह्यात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा पाणीबचत व पुनर्वापराचा प्रयोग त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवला. गावकऱ्यांनीही अशा प्रयत्नांसाठी पुढाकार घ्यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यामार्फत प्रयत्न करण्यात आले.
जलजागृतीसाठी आणि जिल्ह्यातील पाणीसमस्येवर मात करण्यासाठी उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे त्यांचे वैशिष्टय ! जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,नागरी विकास यंत्रणा आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या मदतीने त्यांनी जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक पाणीस्त्रोत स्वत: पाहिले. कोरड्याठक्क पडलेल्या पाणी साठ्यांच्या ठिकाणी अन्यत्र कोठून पाणी येवू शकेल काय, याची चाचपणी केली. भूजल वैज्ञानिकांची आणि अत्याधुनिक तंत्राची मदत त्यासाठी त्यांनी घेतली. कोरड्या पडलेल्या तेरणा मध्यम प्रकल्पात त्यांनी गाळ काढण्याची मोहिम हाती घेतली. त्यामुळे तेथे पाणी उपलब्ध होऊ लागले. उस्मानाबादकरांसाठी ही फार मोठी गोष्ट होती. प्रश्न भिजत ठेवण्यापेक्षा थोडा उशीर लागला तरी चालेल मात्र त्यावर कायमस्वरुपी उपाय शोधावा, ही त्यांची काम करण्याची पध्दत. एखाद्या गावात गेले तरी गावकऱ्यांशी ते सहज संवाद साधतात. प्रशासनाविषयी तक्रारी आल्या तरी प्रश्न समजावून घेवून त्यातील वस्तुस्थिती सर्वांसमोर ते मांडतात. जिल्हा प्रशासन अथवा शासनाकडून अपेक्षा व्यक्त करताना लोकांनीही विकास कामांसाठी पुढे आले पाहिजे, ही त्यांची धारणा आहे. आपला गाव समृध्द व्हावा ही भूमिका प्रत्येक नागरिकाने जपली पाहिजे. आपल्या शिवारातील प्रत्येक पाण्याचा थेंब आपल्या शिवारातच अडवला गेला पाहिजे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांचे प्रयत्न आहेत.
प्रत्येक गावाला पाण्याची गरज आहे.त्यामुळे एक गाव आपल्या हक्काचे पाणी दुसऱ्याला कसे देईल? त्यासाठी प्रत्येकाने पाणीबचतीसाठी आग्रही असले पाहिजे, असा विचार ते प्रत्येक ठिकाणी मांडतात आणि स्वत: त्याची अंमलबजावणीही करतात.केवळ नागरिकांच्या नव्हे तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोयही महत्वाची आहे हे ते आवर्जुन सांगतात.
पाण्याविषयी तसेच पाण्याच्या महत्वाविषयी नागरीकांपर्यंत पोहोचून स्वत: जलजागृतीसाठी पुढाकार घेणारा प्रशासक म्हणून डॉ. नागरगोजे यांची ओळख निर्माण होत आहे. दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी जलजागृतीचे महत्व प्रत्येकानेच जाणले पाहिजे, तरच त्यांच्या कृतीला प्रयत्नांची जोड मिळाली असे म्हणता येईल.

- दीपक चव्हाण
प्र.जिल्हा माहिती अधिकारी,
उस्मानाबाद