तुळजापूर -: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणा-या व पशुहत्येसाठी सर्वश्रूत असलेल्या मराठवाड्यातील चिवरी (ता. तुळजापूर) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या अंगावरील जुने पारंपारिक सोन्या-चांदीचे अलंकार, दागदागिने अज्ञात दरोडेखोरांनी पुजा-यावर तिक्ष्ण सशस्त्र व दगडाने हल्ला करुन लुटल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्यांच्या झटापटीत एक पुजारी गंभीर जखमी झाला असून अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या पुजा-यास सोलापूर येथील मार्कंडेय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेत अंधाराचा फायदा घेऊन सुमारे पाच ते सात लाख रूपये किंमतीच्या ऐवजावर चोरटयानी डल्ला मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास गुरुनाथ काळजते (वय 26, रा. चिवरी, ता. तुळजापूर) असे गंभीर जखमी तर मारुती बळीराम काळजते, नागनाथ रघुनाथ काळजते (दोघे रा. चिवरी, ता.तुळजापूर) असे किरकोळ जखमी झालेल्यांचे नावे आहेत. चिवरी (ता. तुळजापूर) या गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर असून गावापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर आहे. गावातील पुजारी कैलास काळदाते, मारुती काळदाते, नागनाथ काळदाते यांच्याकडे पुजा-अर्चा व मंदिर देखभालीची जबाबदारी आहे. दर मंगळवारी व शुक्रवारी भाविकांची येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे मुखवटा व अलंकार या दिवशी मंदिरात आणले जातात. पूजा, आरती झाल्यानंतर मुखवटा व अलंकार सायंकाळी परत घरी नेले जातात. चिवरीचे महालक्ष्मी मंदिर गावापासून दूर निर्जन स्थळी असून मंदिराजवळ लोकवस्ती नाही. त्यामुळे सुरक्षितेसाठी दररोज चिवरी गावातून मुखवटा व पारंपारिक दागिने आणून मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते आणि अलंकारही घातले जातात. मंगळवार दि. 5 मार्च रोजी श्री महालक्ष्मी देवीचे अलंकार घेऊन कैलास काळजते यांनी चिवरी येथील आपल्या घरुन मंदिरात नेले. पूजा करुन देवीस पारंपारिक अलंकार घातले. दिवसभर मंदिरात भाविक भक्ताचे देवदर्शन विधी संपल्यानंतर देवीचे अंगावरील जुने पारंपारिक सोने-चांदीचे दागिने, सोन्याचे पिंपळपान, नाकातील नथनी पाच ग्रॅम, कानातील टॉप्स (झुबे) एक तोळा, कपाळावरील टिकली 1 ग्रॅम, सोन्याचे बोरमाळ, सोन्यांचे गंठण, चांदीचा मुखवटा आणि किरीट वजन सव्वा किलो चांदीचा कमरपट्टा, पावकिलो चांदीची छत्री, लिंगाकार, लक्ष्मीहार (पुतळ्याच्या माळा), चांदीचा एक मोठा हार, पितळेच्या दोन किलोच्या पादुका, स्टीलचे तबक (ताट) असे एकूण 2 लाख 25 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने देवीच्या साडीत बांधून पुजारी कैलास काळजते, मारुती काळजते, नागनाथ काळजते असे तिघेजण देवीच्या मंदिरातून चिवरी गावाकडे मधल्या वाटेने चालत जात असताना अंदाजे साडे सात ते पावणे आठ वाजण्याच्या सुमारास चिंतामणी मंदिराच्या पुढे गावाकडे गेल्यानंतर रस्त्यात दोन अनोळखी इसमानी या तिघांना दगडाने व शस्त्राने मारहाण केली. या मारहाणीत कैलास काळजते याच्या कपाळावर, डोळ्याजवळ मार लागून गंभीर जखमी झाले. तर अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले. त्यानंतर चोरट्यानी दागिन्याचे गाठोडे हिसकावून घेऊन पळून गेले. यावेळी चोरटयानी पूजेचे रोख नऊ हजार रुपयेही हिसकावून घेऊन गेले. या घटनेची पोलिसात कैलास काळजते यांनी तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर उस्मानाबादच्या श्वान पथकास पाचारण करण्यात आले. यावेळी श्वानने जवळील द्राक्ष बागेपर्यंत चोरट्यांचा माग काढल्याचे सूत्रांनी सांगितले. ही घटना समजताच उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक भांगे, उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मिष्ठा घारगे-वालवलकर, स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक गुंडिले, तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर हे करीत आहेत.