नागपूर -: नागपुरातील एका शाळेच्‍या आवारातच एका 12 वर्षीय विद्य‍ार्थिनीवर बलात्‍काराची खळबळजनक घटना घडली आहे. मुलीला रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले असून वैद्यकीय तपासणीमध्‍ये बलात्‍कार झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. गेल्‍या 24 तासांमध्‍ये बलात्‍काराची ही तिसरी घटना आहे. याप्रकरणी मुलीच्‍या घराजवळ राहणारा 24 वर्षीय तरुण नंदकिशोर बावनकर याला अटक करण्‍यात आली आहे.
         प्राप्‍त माहितीनुसार,  पीडित मुलगी आज सकाळी शाळेत प्रवेश करत असतानाच एका अज्ञात व्‍यक्तीने तिला उचलून नेले. तिला त्‍याने शाळेच्‍याच आवरात नेऊन बलात्‍कार केला. मुलीला रडत असताना शाळेच्‍या काही कर्मचा-यांनी पाहिल्‍यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यानंतर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या ती रुग्णालयात आहे. या मुलीने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
        गोव्‍यात एका प्रतिष्ठीत शाळेत 14 जानेवारी रोजी एका मुलीवर बलात्‍कार करण्‍यात आला होता. या प्रकरणानंतर गोव्‍यात प्रचंड गदारोळ झाला होता. याप्रकरणातही अद्याप खरा गुन्‍हेगार पोलिसांच्‍या हाती लागलेला नाही.
* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top