नळदुर्ग -: कुठलेही कार्य करताना त्‍याला डोक्‍याची जोड दिली की माणूस विकसित होतो, असे प्रतिपादन जेष्‍ठ विचारवंत, सा‍हित्यिक व समाजवादी नेते पन्‍नालाल सुराणा यांनी चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथे केले.
    सेंटर फॉर हेल्‍थ अँड सोशल जस्‍टीस दिल्‍ली, सम्‍यक संस्‍था पुणे संचलित कामधेनू सामाजिक संस्‍था फुलवाडी (ता. तुळजापूर) व आधार सामाजिक संस्‍था इटकळ (ता. तुळजापूर) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्‍या ‘बापांची शाळा’ या अभियानामध्‍ये प्रमुख पाहुणे म्‍हणून पन्‍नालाल सुराणा हे बोलत होते. पुढे बोलताना ते म्‍हणाले की, शिक्षण हे फक्‍त चार भिंतीच्‍या आत असलेल्‍या शाळेमधूनच मिळत नाही तर खरे शिक्षण हे आपल्‍या घरातून, व्‍यवहारातून, शेतातून मिळत असते. भाषा ही तर चांगली शिकली पाहिजे. त्‍याचबरोबर गणित आणि विज्ञा शिकताना विद्यार्थ्‍यांकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. आपल्‍या मुलांची गुणवत्‍ता वाढावी वाटत असेल, त्‍याला कुठलेही व्‍यसन लागू नये, यासाठी पालकांनी स्‍वतः विद्यार्थ्‍यांकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपल्‍या अंगात मुरलेल्‍या व्‍यसनाला मुठमाती द्यावी, आपला विद्यार्थी काय करतो, कुठे जातो, त्‍याच्‍या आवडीनिवडी काय आहेत, हे पालकांनी जाणून घ्‍यावे व पालक आणि बालक यांच्‍यामध्‍ये सुसंवाद होणे, ही काळाची गरज आहे असे सांगून ‘बापांची शाळा’ या अभियानास शुभेच्‍छा दिल्‍या.
    या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथील सरपंच राजेंद्र गरड तर प्रमुख पाहुणे म्‍ळणून विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्‍मण गायकवाड, देवराव शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष यशवंत गायकवाड, प्रभाकर मोटे, प्रा. दत्‍ता साधरे, आर.एस. गायकवाड, दादासाहेब बनसोडे, सोमनाथ बनसोडे, प्रवीण राठोड, गोविंद सुर्यंवशी, धनराज आडगळे आदीजण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कामधेनू सामाजिक संस्‍थेचे अध्‍यक्ष बळीराम जेठे यांनी तर सुत्रसंचालन ज्ञानकिरण सामाजिक संस्‍थेचे सचिव भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार आधार सामाजिक संस्‍थेचे दयानंद काळुंके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महिला, पुरुष, युवक, ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top