नळदुर्ग -: चिवरी (ता. तुळजापूर) येथील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणा-या महालक्ष्मी देवीचा मुखवटा व पारंपारिक दागिने चोरी होवून दोन आठवड्याचा कालावधी उलटत आला तरी अद्यापपर्यंत त्या चोरीच्या घटनेचा पोलीस तपास संथ गतीने सुरु असल्याने व त्यात पोलिसांच्या हाती धागेदोरे न लागल्याने भाविकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
पशुहत्येसाठी सर्वश्रूत असलेल्या मराठवाड्यातील चिवरी (ता. तुळजापूर) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या अंगावरील जुने पारंपारिक सोन्या-चांदीचे अलंकार, दागदागिने अज्ञात दरोडेखोरांनी पुजा-यावर तिक्ष्ण सशस्त्र व दगडाने हल्ला करुन लुटल्याची खळबळजनक घटना मंगळवार दि. 5 मार्च रोजी रात्री घडली होती. अज्ञात चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत कैलास गुरुनाथ काळजते हे पुजारी गंभीर जखमी झाले होते. तर अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी चिवरी येथील एका महिलेसह दोघा युवकांना व उमरगा तालुक्यातील दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. परंतु पोलिसांच्या हाती अद्यापपर्यंत काहीच लागले नाही. चोरी होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर व चोरी झाल्यानंतर आठ दिवसातील संशयितांचे मोबाईलवरील संभाषणाची टीप मिळाल्यानंतर ब-याच गोष्टीचा उलगडा होईल, असे पोलिसांचे मत आहे.
चिवरी (ता. तुळजापूर) या गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर असून गावापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर आहे. गावातील पुजारी कैलास काळदाते, मारुती काळदाते, नागनाथ काळदाते यांच्याकडे पुजा-अर्चा व मंदिर देखभालीची जबाबदारी आहे. दर मंगळवारी व शुक्रवारी भाविकांची येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे मुखवटा व अलंकार या दिवशी मंदिरात आणले जातात. पूजा, आरती झाल्यानंतर मुखवटा व अलंकार सायंकाळी परत घरी नेले जातात. चिवरीचे महालक्ष्मी मंदिर गावापासून दूर निर्जन स्थळी असून मंदिराजवळ लोकवस्ती नाही. त्यामुळे सुरक्षितेसाठी दररोज चिवरी गावातून मुखवटा व पारंपारिक दागिने आणून मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते आणि अलंकारही घातले जातात. मंगळवार दि. 5 मार्च रोजी श्री महालक्ष्मी देवीचे अलंकार घेऊन कैलास काळजते यांनी चिवरी येथील आपल्या घरुन मंदिरात नेले. पूजा करुन देवीस पारंपारिक अलंकार घातले. दिवसभर मंदिरात भाविक भक्ताचे देवदर्शन विधी संपल्यानंतर देवीचे अंगावरील जुने पारंपारिक सोने-चांदीचे दागिने देवीच्या साडीत बांधून पुजारी कैलास काळजते, मारुती काळजते, नागनाथ काळजते असे तिघेजण देवीच्या मंदिरातून चिवरी गावाकडे पायी चालत जाताना अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन त्यांच्याकडील सोन्याचांदीचे असलेले दागिने व पूजेचे रोख रक्कम हिसकावून अंधाराचा फायदा घेवून पळून गेले.
याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरून या घटनेचा छडा लावण्याची मागणी भाविकांतून केली जात आहे.