नळदुर्ग -: जळकोट (ता. तुळजापूर) येथील शिवनेरी बेकरी व लोकसेवा रिक्षाचालक-मालक लोककल्याणकारी मंडळ यांच्यावतीने बसस्थानक येथे दोन ठिकाणी मोफत पाणपोई सुरु करण्‍यात आली आहे. या पाणपोईचा शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत नवगिरे, श्रीनिवास पाटील, राजेंद्र पाटील, किशोर कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनसेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
    जळकोट हे सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील गाव असून या ठिकाणी शनिवार या दिवशी परिसरातील सर्वात मोठा आठवडी बाजार भरतो. त्‍यामुळे परिसरातील बहुतांश गावकरी यांची नेहमीच वर्दळ याठिकाणी असून पाणीटंचाईच्‍या काळात पाणपोई सुरु केल्‍याने सर्वसामान्‍य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
 
Top