नळदुर्ग -: जागतिक महिलादिनानिमित्त कर्तृत्वान महिलांचा सत्कार सोहळा रविवार रोजी नळदुर्ग येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा तुळजापूर तालुका दक्षता समितीच्या सदस्या सौ. शाहेदाबी सय्यद यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते भव्य सत्कार करुन गौरविण्यात आले.
नळदुर्ग शहर भोई समाजाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त 'कर्तृत्वान' महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी कॉंग्रेस उस्मानाबाद जिल्हा महिला अल्पसंख्याक विभागाच्या उपाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या शाहेदाबी सय्यद यांचा पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र बोरगावकर, माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, नळदुर्ग भोई समाजाचे अध्यक्ष सुनिल उकंडे, माजी नगराध्यक्षा निर्मलाताई गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला, महिला बचतगटाच्या सदस्या व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.