सोलापूर -:  पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंद असलेल्या 13 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी दिले.
    शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांनी आज दुष्काळी आढावा बैठक घेतली या बैठकीस रोहयो उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार, जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे, जि.प.पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजकुमार चंदनशिवे, मजीप्राचे कार्यकारी अभियंता बी.पी. बंडगर आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता ए.पी.पठाण उपस्थित होते.
    बैठकीत सूचना देताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यात सध्या 29 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांपैकी 16 योजना चालू स्थितीत आहेत. उर्वरित योजना लवकर कार्यान्वित होण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठ्याशी सर्व विभागातील अधिका-यांची बैठक घेऊन ठोस कार्यपध्दतीने मार्ग काढून या योजना कार्यान्वित केल्या पाहिजेत. 
    तसेच नरेगा कामावरती मजूराची संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखाला लेखी सुचना देवून लोकांच्या मागणीतून पुढे आलेल्या कामांना प्राधन्य देवून ती कामे तातडीने सुरु करावित असेही , पालकमंत्री बैठकीत म्हणाले. टँकरच्या खेपा, नरेगाची कामे, मजूरांचे हजेरी पट  इत्यादी कामांचे सनियंत्रण योग्यरित्या होण्यासाठी जिल्हाधिका-यांनी स्थापन केलेल्या कोअर समितीने प्रत्यक्ष तालुक्यांमध्ये जाऊन पहाणी करावी.
    जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी त्यांच्या परिसरात टँकर मधील पाणी साठविण्यासाठी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन द्याव्यात. त्याचबरोबर आर्थिकदृष्टया सक्षम असलेल्या सहकारी पतसंस्था आणि बँकांकडून उपलब्ध होणा-या 1200 पाण्याच्या टाक्या परिसरात वाटप करुन पाणीटंचाई दूर करण्यास मदत करावी असेही ते म्हणाले.
    टीम व्हीवर सोईद्वारे जिल्ह्यातील सर्व नरेगाची कामे एमआयएस मध्ये समाविष्ट करण्याचेही त्यांनी सूचीत केले. जिल्ह्यात सध्या 178 छावण्या आणि 402 टँकर्स सुरु असल्याची माहिती भालेदार यांनी दिली.
 
Top