पुणे -: आई आपल्या मुलांवर चांगले संस्‍कार करुन त्‍यांचे चांगले भविष्‍य पाहण्‍यासाठी तन, मन, धन अर्पुन आयुष्य झिजवते, म्हणुनच मुले कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर बनतात. याचे सर्व श्रेय जन्‍मदात्री आईलाच जाते असे सांगून काव्यमित्र संस्थेनी आदर्श मातांचा गौरव करुन एक सामाजिक बांधिलकी जतन करुन जिव्हाळयाचा संदेश दिला आहे, असे प्रतिपादन कवयित्री सौ. अनघा पाठक यांनी केले.
    पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्यावतीने आयोजित जागतिक महिलादिनानिमित्त नऊ मातांना राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार, दहा महिलांना महिला समाजभुषण पुरस्कार, या बरोबरच सासू-सुनांनाचाही आदर्श आदर्श सासू-सुना म्‍हणून गुणगौरव व  कवयित्री प्राची देशपांडे यांच्या "सप्तरंग" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन, महिला कवी संमेलन असे भरगच्च कार्यक्रम नुकतेच संपन्‍न झाले.
    या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सौ. अनघा पाठक तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरीचिंचवड महानगरपालिकेचे उपअभियंता संजय कांबळे, मुंबई येथील कवयित्री सौ. पल्लवी बनसोडे हे उपस्थित होते.     राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार सौ. भारतबाई देवकर, श्रीमती अविदा जगदाळे (तुळजापूर), सौ. इंदमुती भोरे (सोलापूर), सौ. विजया क्षिरसागर (बीड), सौ. पुष्पाताई कर्नावट (दापोडी), सौ. पार्वतीबाई गोरेडे, श्रीमती कौशल्याबाई निकम (खेड), सौ. शशिकला बनकर (भोसरी) यांना डॉ. नरेंद्र काळे यांच्या आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले. तर महिला समाज भूषण पुरस्कारांमध्ये सौ. सरुबाई वाघमारे (उस्मानाबाद), सौ. करुणा गायकवाड (सोलापूर), सौ. अर्चना घुले, सौ. निर्मल पाषाणकर, सौ. वंदना जाधव (पुणे), कु. मयुरी जोशी (अंबेजोगाई), शोभा फुलसुंदर, अरुणा जाधव (जुन्नर), सौ. योगिता संते (खेड), डॉ. नेहा बोरसे (भोसरी) यांना सौ. अनघा पाठक व सौ. पल्लवी बनसोडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचबरोबर सहा आदर्श सासु-सुनांना अनुक्रमे मंगल स्मिता बागमार, पुष्पा निता लुणावत, प्रभावती भाग्यश्री कुलकर्णी, सुभद्रा उज्ज्वला जगताप, शालिनी मधुश्री ओव्हाळ, करुणा संगिता मोरे या सासू-सुनांना पिंपरीचिंचवड महानगरपालिकेचे उपअभियंता संजय कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
    या कार्यक्रमात सौ. प्राची देशपांडे यांच्या "सप्तरंग" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शहाजी भंडारे, श्रीकांत दाते, सौ. मिनाताई मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले आहे. निमंत्रित महिला कवी संमेलनात श्रुतकिर्ती धस (सांगली), संगिता झिंजुरक, सौ. अर्चना घुले (बीड), शोभा जोशी (चिंचवड), मेघा टिळेकर (कोंढवा) यांनी खास शैलीत कविता सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
    या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सुरेशभाऊ लुणावत, सुत्रसंचालन डॉ. प्रियंका लुणावत तर आभार बाबासाहेब जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन काव्‍यमित्र संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजीव सगर यांनी केले होते.
 
Top