उस्मानाबाद -: परंडा तालुक्यातील शिराळा येथील नदी पात्रात अवैध वाळू उत्खननास मदत करणा-या सात जणांविरुद्ध आसू येथील मंडळ अधिकारी यांनी पोलीसात गुन्हा दाखल केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. सहा जमीन मालक आणि गावठाण हद्दीतील एका इसमावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.