नळदुर्ग : थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी घराची विजेची जोडणी तोडणार्‍या वीज कर्मचार्‍याला एका युवकाने बेदम मारहाण केल्‍याची घटना शुक्रवार दि. 22 मार्च दुपारी अडीच वाजण्‍याच्‍या सुमारास जळकोट (ता. तुळजापूर) येथे घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांत एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.
    दिलीप हरिबा राठोड (वय 40) असे मारहाण केलेल्‍या वीज कर्मचा-याचे नाव आहे. तर शकील रशिद शेख (वय 25, रा. जळकोट) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या युवकाचे नाव आहेत. यातील कर्मचारी दिलीप राठोड हे जळकोट (ता. तुळजापूर) येथील संभाजीनगर भागात शुक्रवारी थकीत वीज बिलासाठी वसुलीसाठी शकील शेख याच्‍या घराची वीज तोडली. वीज का तोडली, असे जाब विचारत शकील याने रागाच्‍या भरात राठोड यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी दिलीप राठोड यानी दिलेल्‍या फिर्यादीवरुन शकील शेख याच्‍याविरूद्ध नळदुर्ग पोलिसात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
 
Top