
किती सांगू मी सांगू कुणाला
आलं उजनीचं पाणी नळाला
आज आनंदी आनंद झाला
पाणी पिऊ चला
अंघोळ करु चला
आलं उजनीचं पाणी नळाला
किती सांगू मी सांगू कोणाला...
पाणी कुठले कुठून
आणले कुंथून कुथ्थून
पूर्ण केलं नकटीच्या लग्नाला
किती सांगू मी सांगू कोणाला...
दादाच्या गं ओठी
शप्पथ होती मोठी
म्हणूनी पाणी अवतरले
दादा येणारं सासरवाडीला
किती सांगू मी सांगू कोणाला....
राणा म्हणे मी आणलं
राजे म्हणे मी आणलं
श्रेयाला नावं किती
किती सांगू मी सांगू कोणाला...
होर्डिंगचा खेळ असा रंगला
शहर सारा दंगला
सा-या शहराचा विदुषक झाला
किती सांगू मी सांगू कोणाला...
आता नेतेही जोमात
जोश रोमारोमात
चमचेही लागणार कामाला
किती सांगू मी सांगू कोणाला...