नळदुर्ग -: छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा बसवेश्‍वर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जन्‍मोत्‍सवानिमित्‍त तुळजापूर तालुक्‍यातील जळकोट येथे ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्त्‍या सिंधुताई सपकाळ यांचे व्‍याख्‍यान, मुंबई येथील सुप्रसिध्‍द शाहीर संभाजी भगत व त्‍यांच्‍या सहकार्यांचे 'शाहीरी जलसा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    जळकोट (ता. तुळजापूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा बसवेश्‍वर महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एकत्रित जयंती साजरी करण्‍यात येत आहे. या सार्वजनिक जन्‍मोत्‍सव कार्यक्रमानिमित्‍त शिवसेनेचे माजी जि.प. सदस्‍य गणेश सोनटक्‍के मित्र मंडळाच्‍यावतीने गुरुवार दि. 4 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौकात समाज प्रबोधनात्‍मक मुंबई येथील शाहिर संभाजी भगत यांचा सहकलाकारांसह शाहिरी जलसा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन लोकमंगल उद्योग समूहाचे कार्यकारी अध्‍यक्ष रोहन देशमुख यांच्‍या हस्‍ते होणार आहे. तसेच दि. 7 एप्रिल रोजी शिवाजी चौकातच अनाथांच्‍या माई व थोर सामाजिक कार्यकर्त्‍या सिंधुताई सपकाळ यांच्‍या जाहीर व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी हे राहणार आहेत. या कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्‍याचे आवाहन सोनटक्‍के मित्र मंडळाने केले आहे.
 
Top