लोहारा -: जेवळी (ता. लोहारा) येथील गणेश मंदिरात रविवारी (दि. 24) ब्राह्मण सभेची बैठक पार पडली. या बैठकीत दि. 15 एप्रिल रोजी लोहारा येथे ब्राह्मण समाजाचा वधू-वर मेळावा आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
    ब्राह्मण सभेचे तालुकाध्यक्ष विजयकुमार कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रथम परशुरामाच्या जयंतीचे औचित्य साधून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर बैठकीत 15 एप्रिल रोजी लोहारा येथील भारतमाता मंदिर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत वधू-वर मेळावा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. या मेळाव्यात समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करून यासाठी रवी कुलकर्णी (लोहारा), पुरुषोत्तम देशपांडे, अच्युतराव जेवळीकर, दिनकर देशमुख (हिप्परगा रवा), अनिल कुलकर्णी (खेड), रामराव कुलकर्णी (धानुरी) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ब्राrाण सभेचे तालुका सचिव बाळासाहेब देशपांडे यांनी केले आहे.
 
Top