उमरगा -: भरधाव टँकरने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने एक युवक जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि. 23 मार्च रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास येळीपाटी (ता. उमरगा) येथे घडली.
मोहम्मद अन्सार मुदगुले (30, रा. दाळींब, ता. उमरगा) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर दिलीप लक्ष्मण कुंभार (रा. दाळिंब) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. यातील मोहम्मद मुदगुले व दिलीप कुंभारी हे दुचाकी (क्रं. एमएच 14 4652) वरून शनिवारी रात्री उमरगा येथून दाळिंबच्या दिशेने निघाले होते. त्यांची दुचाकी राष्ट्रीय महामार्गावरील येळीपाटीनजीक पोहोचली असता, हैदराबाद येथून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या टँकर (एपी 23, वाय 7192) ने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेला मोहम्मद मुदगुले हा तरुण जागीच ठार झाला. तर दिलीप कुंभार गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचाराकरिता उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातानंतर टँकरचालक वाहन सोडून फरार झाला. अपघाताची माहिती समजताच उमरगा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अपघातातील टँकर पोलिसांनी जप्त करून पोलिस ठाण्यात आणून लावला आहे.
याप्रकरणी जखमी दिलीप कुंभार यांच्या फिर्यादीवरून टँकरचालक राजकुमार यादव (रा. चितावाडी, जिल्हा जबलपूर, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल एस. आर. आरदवाड करीत आहेत.