अणदूर (साहेबराव घुगे) -: तुळजापूर तालुक्यामध्ये दुष्काळाने उग्र रुप धारण केल्याने शेतक-यांना पशुधन जोपासण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागत आहे. सध्या तुळजापूर तालुक्यामध्ये पशुधन बचावासाठी एकही चारा छावणी उघडली गेली नसल्याने हे पशुधन कत्तलखान्याकडे जात असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. दुष्काळी संकट दूर होईलपर्यंत ही कत्तलखाने बंद केली तर पशुधनाचा बचाव होईल, ही महत्त्वाची बाब तालुक्याच्या टंचाई निर्वारणात अनेक बैठकामध्ये मांडूनही याकडे दूर्लक्ष केले जात आहे. जेथे माणसांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, त्याठिकाणी जनावरांचे पालनपोषण ही बाब शेतक-यांच्या हाताबाहेर गेली आहे. ही स्थिती अशीच राहिली तर या ठिकाणी जनावरांचा सांभाळ होत होता का? अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शासनाने शेतक-यांच्या बांधावर खतपुरवठा जशी योजना सुरु केली, तशीच योजना शेतक-यांच्या गोठयावर चारा पुरवठा केला तर पशुधन बचावासाठी मदत होणार आहे. म्हणून शासनाने याचा गांभिर्याने विचार करुन सुरु असलेले कत्तलखाने बंद करावीत व चारा छावण्या सुरु कराव्यात, तरच पशुधनाचा बचाव होईल. ही प्रकाशाने बाब समोर येत आहे.