मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज्यात सत्ता आणणार आणि ती स्वबळावर आणणार असा निर्धार व्यक्त करत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशाल युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.
मनसेचा शनिवारी सातवा वर्धापन दिन आहे. त्यानिमीत्त षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
विशाल युतीची खिल्ली उडवत राज ठाकरे यांनी शिवसेनाला पुन्हा चिमटा काढला आहे. ते म्हणाले, खिडकीतून डोळे मारणं बंद करा!
शुक्रवारी एका मराठी दैनिकाने आगामी निवडणूकीत मनसे-शिवसेना-भाजप- आरपीआय अशी विशाल युती होणार असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दिवसभर चर्चा सुरु होत्या. त्या सर्व शक्यता फेटाळून लावत राज म्हणाले, काल सकाळी एका वृत्तपत्रात विशालयुतीची पुन्हा 'टाळी' वाजली तिला मी दुपारी 'टाटा' केले आहे.
केवळ मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक पुरता मर्यादित पक्ष अशी टीका करणा-या विरोधकांनांही त्यांनी टोला हाणला. नुकताच ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केला. कोल्हापूर, सोलापूर आणि जालन्यातील त्यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्याचा उल्लेख करुन ते म्हणाले, कालपर्यंत जे आम्हाला महानगरापूरता मर्यादित पक्ष म्हणून हिणवत होते, आता त्यांनी तोंडात बोटे घातली आहे.
आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मनसेला पराभूत करायचे असेल तर त्यांच्या मतदारांची, विशेषतः मराठी माणसांची नावेच मतदार यादीतून काढून टाका हे षडयंत्र आपल्याविरुद्ध रचले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता याचा शोध घ्यावा. हे कवेळ केवळ मुबंईतील काही भागातच झाले आहे की, मुबंईसह संपूर्ण महाराष्ट्रात असे प्रकार झाले आहेत याचा तपास कार्यकर्त्यांनी लावावा असे अवाहन त्यांनी केले.

* सौजन्य दिव्यमराठी