सोलापूर :- ग्रंथप्रसारासाठी वृत्तपत्रांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. असे प्रतिपादन दै. लोकमतचे संपादक राजा माने यांनी केले.
येथील स्व.डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ग्रंथोत्सव 2013 निमित्त ग्रंथप्रसारामध्ये वृत्तपत्राचे योगदान या परिसंवादात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सोलापूर विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. रविंद चिंचोलकर, जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी, शासकीय जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल दत्तात्रय क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना राजा माने म्हणाले की, वृत्तपत्रांनी फार पूर्वीपासून लेखक, कवी, घडविण्यामध्ये आपले योगदान दिले आहे. सोलापूर स्व. रंगा आण्णांच्या कालखंडात अनेक नवोदीत लेखक, कवींना प्रोत्साहन देऊन त्यांना लिहिते ठेवण्याचे काम केले. एवढेच नव्हे तर त्यांना राज्यपातळीवरही नावलौकिक मिळवून दिला. या पध्दतीने मराठवाड्यात व राज्यातील अन्य भागात वृत्तपत्रांनी याकामी मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले.
वृत्तपत्रामध्ये पुस्तक परिचय, लेखक परिचय आदी बाबत विस्ताराने लिहिलेले वाचले जात नाही हे अभ्यासातून दिसून आले आहे. विषय वाचकांनी बदलला आहे त्याला वृत्तपत्रांनी मान दिलेले आहे. हा बदल टप्प्या - टप्प्यांनी वृत्तपत्रांना करावा लागला आहे.
आज मल्टीमिडीयाच्या जमान्यात ई - बुकची संख्या किती प्रमाणात वाढते आहे या पार्श्वभूमीवर छापील पुस्तकाबाबत नियोजनबध्द पध्दतीने काम केले तर ग्रंथांची निश्चित कदर होईल व प्रयत्न होईल असे प्रतिपादन श्री माने यांनी केले तसेच पत्रकार म्हणून कार्य करताना आपल्या वृत्तपत्रांना विविध सदर लेखन करणा-यांना प्रोत्साहन देवून त्यांच्या निवडक सदर, मासिकांचे ग्रंथामध्ये रुपांतर होण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. आणि या ग्रंथांना चांगली मागणी असल्याचेही श्री. माने यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलतांना प्रा. डॉ. रविंद्र चिंचोलकर म्हणाले की, सुरुवातील साहित्य डोळ्यासमोर ठेवूनच वृत्तपत्रे निघाली. आज साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे. वृत्तपत्रांची संख्या व विक्री होणा-या वृत्तपत्रांची संख्या देखील दरवर्षी वाढत आहे. पूर्वी अनेक कादंब-या क्रमश: वृत्तपत्रांमध्ये येत असत. परंतू या जागतिकीकरणाच्या काळात जागतिकीकरणामूळे वाचक रंजकवादाकडे वळला आहे. आज दृक चित्रवाणी जमान्यामध्ये अनेक वाहिन्यांनी लोकांना जखडून ठेवले आहे त्यामूळे वाचन संस्कृतीला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
वृत्तपत्रे ही कायमस्वरुपी ज्ञान प्रसाराचे काम करतात. कारण वृत्तपत्रांमधून निघणा-या विविध पुरवण्यांमधून साहित्य जगाचा मागोवा घेण्यात येतो परंतू त्याचे प्रमाण वाढले पाहिजे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आली असली तरीही वृत्तपत्रे सातत्याने ग्रंथ प्रसारामध्ये भरीव योगदान देत आहेत असेही डॉ. चिंचोलकर शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन फारुक बागवान यांनी केले.