नळदुर्ग -: नळाच्या पाण्याच्या कारणावरुन दोन गटात लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्याने झालेल्या मारहाणीत पाजजण गंभीर जखमी झाल्याची घटना खुदावाडी (ता. तुळजापूर) येथे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी परस्पर तक्रारीवरुन सातजणांविरुध्द नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारुती सुरवसे, अशोक सुरवसे, भगवान सुरवसे, महादेव खजुरे, शिवराज खजुरे (सर्व रा. खुदावाडी, ता. तुळजापूर) असे मारहाणीत जखमी झालेल्यांचे नावे आहेत. यातील महोदव खजुरे, निलाप्पा खजुरे, अनिल खजुरे, शिवराज खजुरे या सर्वांनी पाणी भरण्याच्या कारणाची कुरापत काढून भगवान सुरवसे यांना नळाच्या लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. तर सदरील भांडणे सोडविण्यासाठी आलेले मारुती सुरवसे, अशोक सुररवसे यांनाही लोखंडी पाईपने व दगडाने मारुन गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद भगवान सुरवसे यांनी दिल्यावरुन नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर महादेव तुकाराम खजुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नळाच्या पाण्याच्या कारणावरुन भगवान सुरवसे, मारुती सुरवसे, अशोक सुरवसे, बालाजी सुरवसे यांनी संगनमताने महादेव खजुरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यांचा मुलगा शिवराज हा भांडण सोडविण्यास आला असता त्याला मारहाण करुन सळईने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद महादेव खजुरे यांनी नळदुर्ग पोलिसात दिली.
याप्रकरणी परस्पर तक्रारीविरुध्द नळदुर्ग पोलिसात सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार दौलत कदम हे करीत आहेत.