खैराव कुंभेज पूल तसेच रस्ते विकासासाठी 8 कोटी रुपयांच्या विकाकामांना ङ्कंजूरी मिळाल्यामुळे 15 ते 20 किलोमीटर प्रवास वाचेल व हीच 10 व्या साहित्य संमेलनासाठी भेट असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी म्हटले.
इंटरनेटवरील नकाशावरही या गावाचा रस्ता दिसत नाही त्या ठिकाणी हे 10 वे ग्रामीण साहित्य संमेलन होत असून
फेसबुकवरुन जगाशी संपर्क साधणारे हायटेक ग्रामीण समेलन हे तर जागतिक ग्रामीण साहित्य संमेलन असल्याचे संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी म्हटले तर साहित्य संमेलनाची उंची त्या गावावरुन नसल्याचवे उद्घाटक राजा माने यांनी म्हटले.
अनेक प्रकारच्या भानगडींनी जेथे आजकालची साहित्य संमेलने गाजतात. त्या काळात अतिशय शिस्तबध्द, आपुलकीने, केवळ साहित्यावर बोलणारे, साहित्याशी संवाद साधणारे, साहित्याशिवाय काहीच नसलेले साहित्य संमेलन तसेच दुर्गम भागातील ग्रामीण लोकांशी थेट संवाद साधणारे व त्यांच्या साहित्यावर प्रेम करणार्यांचा मेळावा या निमित्ताने पहावयास मिळाला.
ग्रंथ दिंडी :
दुपारी 4 च्या सुमारास विलासराव देशमुख साहित्य नगरीतून विविध सुमधूर वाद्यांच्या गजरात निघालेली ग्रंथदिंडी ग्रामदैवत नागन्नाथ मंदिराला वळसा घालून गावातून निघाली. संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोरे, उद्घाटक राजा माने, संजय येऊलकर, शब्बीर मुलाणी, सुमन चंद्रशेखर, विक्रम सावळे यांच्यासह बाहेर गावचे तसेच साहित्यीकांनी यात सहभाग नोंदविला. ज्ञानेश्वरी, फळे, फुले व वृक्षवल्लींनी युक्त असलेल्या ग्रंथदिंडीसमोर ढोल, ताशे, तुतारी तसेच धनगरी ओव्या गाणारे साहित्यीक, राष्ट्रपुरुषांचा वेश परिधान केलेले विद्यार्थी, बैलगाड्या इत्यादिंनी संपूर्ण खैराव दुमदुमला होता. एक अनोखा उत्साह गावकर्यांच्या अंगात सळसळत असलेले आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सोलापूर येथील प्रदीप गायकवाड यांचे बासरी वादन झाले. बासरी वादनानंतर महारुद्र जाधव यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्राचे प्रदर्शन सुरु झाले. दिलीपराव सोपल माध्यमिक विद्यालय, हळदुगे येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले.

पुरस्कार वितरण :
साहित्य संमेलनात देण्यात आलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे
जीवनगौरव - ज्ञानदेव मोरे (निवृत्त रेल्वे अभियंता), कृषिनिष्ठ - जरिचंद नागटिळक, आदर्शपत्रकार - बाळासाहेब बोचरे, आदर्श शिक्षक - प्रा.डॉ.आण्णासाहेब मोहोळकर, आदर्श ग्रंथालय - हरिभाऊ शिंदे वाचनालय, अरण, साहित्य - देवेंद्र औटी, समाजसेवा - विक्रम सावळे, जलशाहिर - रमेश खाडे याशिवाय ज्यांनी साहित्य संमेलनात विशेष योगदान दिले त्यांच्याकरिता माय मराठीचे वारसदार या विशेष पुरस्काराने कवी कालिदास मंडळ, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे शरद गोरे यांना गौरिवण्यात आले.
काव्यजागर मध्ये विद्याधर गव्हाणे यांच्या 'गावची नदी वाहत होती तवा' या कवीतेला प्रेक्षकांनी व साहित्यीकांनी दाद दिली. कवी सुमन चंद्रशेखर, टकले, भानवसे, जाधव, राम कदम यांनी कवीता सादर केल्या.
क्षणिचत्रे :
* ग्रामीण साहित्यावरील अपार प्रेम करणार्या कै.विलासराव देशमुख यांच्या नावाने साहित्य नक्षरी
* कवि सुरेश पाठक याचे कविसंमेलनाच्या व्यासपीठास नांव
* व्यंगचित्राद्वारे समाज जागृती व चित्रप्रदर्शन
* सोलापूरचे सुप्रिसध्द बासरीवादक प्रदीप गायकवाड यांनी आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले
* अध्यक्षांच्या ग्रंथदिंडीतील सहभागाने गावकरी चकित
* शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे वेश परिधान करुन सहभाग नोंदविला
* ज्ञानेश्वरी, फळे, फुले व वृक्षवल्लींनी युक्त ग्रंथदिंडी मिरवणुकीतील धनगरी वेशातील साहित्यीकांनी लक्ष वेधले.
* उमानाबाद, भूम, आष्टा, कळंब, जालना, पुणे, बार्शी, पानगांव, उपळाई, सोलापूर, करकम, केम, औरंगाबाद आदि विविध भागातील कविंची साहित्य संमेलनास हजेरी
* साक्षी गायकवाड या विद्यार्थींनीच्या लावणी नृत्याने साहित्यीकांची मने जिंकली
* लमाणी गायन, भारुड, धनगरी ओव्या यासह व्यंग चित्रांची मेजवानी देण्यात आली.