नळदुर्ग -: येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात गुरुवार दि. 14 मार्च रोजी अकरा ते तीन या वेळेत जनसंवाद कार्यक्रमाचे आयो‍जन करण्‍यात आले आहे.
     महाराष्‍ट्र शासनाच्‍या राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान अंतर्गत आरोग्‍य सेवावर लोकधारित देखरेख व नियोजन प्रक्रिये अंतर्गत नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दि. 14 मार्च रोजी अकरा ते तीन या वेळेत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आहे. या कार्यक्रमामध्‍ये संबंधित प्राथमिक आरोग्‍य केंद्रांतर्गत शासनाने ठरवून दिलेल्‍या हक्‍काधारित आरोग्‍य सेवा मिळण्‍यामध्‍ये येणा-या अडचणीवर चर्चा करण्‍यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्‍याचबरोबर गाव आरोग्‍य पाणीपुरवठा पोषण व स्‍वच्‍छता समितीच्‍या देखरेखीमधून आलेल्‍या समस्‍यावरतीही या कार्यक्रमामध्‍ये चर्चा होणार आहे. तरी यार आरोग्‍य जनसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. शशिकांत अहंकारी यांनी केले आहे.
 
Top