उस्मानाबाद -: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा देशाचे माजी उपपंतप्रधान कै.यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. के.एम.नागरगोजे यांनी कै.चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, उपजिल्हाधिकारी तडवी, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिरासे, जिल्हा नियोजन अधिकारी एम.के.भांगे यांच्यासह कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.