उस्मानाबाद :- जिल्हयातील सर्व प्रकारच्या दारु विक्रीची दुकाने दि. 14 एप्रिल रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी जारी केले आहेत. जिल्हयात साज-या होणा-या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभुमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानूसार सर्व देशी-विदेशी मद्य विक्रीची दुकाने, परवाना कक्ष, ताडी विक्री व बिअर शॉपी उपरोक्त दिवशी बंद राहतील.