बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: वीरशैव समाजाच्‍या सर्व पोटजातीसाठी येरटे यांच्‍या मार्गदर्शनाखाली दिनकर रुद्राके यांनी आयोजित केलेल्‍या पहिल्‍याच मेळाव्‍यात 150 जणांनी उत्‍स्‍फूर्त सहभाग नोंदविला. हा मेळावा येथील वीरशैव लिंगायत बोर्डिंग येथे रविवारी दुपारी पार पडला. या मेळाव्‍यासाठी तासगाव, औरगांबाद, शेगाव, अहमदनगर, सातारा आदी गावाहून येत वधू-वर पालकांनी सहभाग नोंदविला. यामध्‍ये जंगम समाजाची उल्‍लेखनीय उपस्थिती होती. काय्रक्रमाच्‍या सुरुवातीस दिपप्रज्‍वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सातारा येथील विठ्ठल गुरसाळे, हिंगमिरे, लातूर येथील तोडकर मॅडम, कडगंची, हाळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळावा यशस्‍वीतेसाठी सुभाष मुलगे, महेश कुलकर्णी, अनुराधा शिलवंत यांनी विशेष सहकार्य केले.
 
Top