यावेळी फादर डॉमेनिल बोलताना म्हणाले, शाळेत चांगल्या भौतिक सुविधा व अद्ययावत यंत्रणेसाठी फी दरवाढ करणे गरजेचे आहे, तसेच पाच हजार स्केअर फूटचे बांधकाम सुरु आहे. संस्थेने विद्यार्थ्यांसाठी टी.व्ही. कॉम्प्युटर, दर्जेदार केमिस्टी, लॅब, फिजीक्स लॅब, बायोलॅब, उत्कृष्ट लायब्ररी, स्वच्छताग्रहे, क्रिडांगण, आधुनिक शिक्षण इत्यादी सुविधा प्रदान करताना कोणत्याही बाबत कसर सोडली नाही. गरीब विद्यार्थ्यांना सवलत देण्यात येते. संस्थेमार्फत इतरही सामाजिक उपक्रम राबविले जातात. बसचे ड्रायव्हरांनी कोणतेही व्यसन करुन नये, तसेच त्यांनी सुट्या घेऊ नये, याकरीता त्यांना जादा वेतन अदा करुन चांगली सेवा पुरवली जाते. शिक्षक व कर्मचारी यांना संपूर्ण वर्षभराचे वेतन देण्यात येते. त्यांना उत्कृष्ट दर्जेदार शिक्षण व भौतिक सुविधा पुरविल्या असून त्यामानाने मोठ्याप्रमाणात खर्च आहे. सद्यस्थितीत दुष्काळाची परिस्थिती असल्याने पाण्याचे तीन ते चार टँकर विकत घ्यावे लागत आहे. डिझेलचे दर वरचेवर वाढत आहेत. त्यामुळे बससेवा देताना त्याचा खर्च वाढत आहे. शासकीय अनुदानाशिवाय चांगल्या दर्जाचे शिक्षण व इतर गावातील शाळेच्या मानाने अत्यंत कमी दरात शिक्षणाच खर्च व फीची आकारण केली जात असून त्या सुविधा देताना त्याचा खर्च वाढत आहे. शासकीय अनुदानाशिवाय त्याकरीता पालकांनी सहकार्य केले.
सदरच्या प्रश्नावर सुमारे 900 पालकांपैकी 40 ते 50 पालकांनी सदर संस्थेच्या आवारात येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आताच्या आता आणि आजच्या आज निर्णय द्या व आम्ही तुमची शाळा चालू देणार नाही व कोणाला आत येऊ दिले जाणा नाही अथवा कोणाला डोनेशन देऊ देणार नसल्याबाबत काहींनी भावना व्यक्त केल्या. काही जणांनी राजकीय व्यक्तींना फोन करुन बोलवून घेतले व आपल्या पाठिशी हे लोक असल्याचे संचालक व फादर यांना निदर्शनास आणून दबाव टाकण्याचा प्रयरूत्न केला.
पालकांच्या लगेच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी बोलताना फादर यांनी म्हटले, माझा हिंदी अथवा मराठी भाषेत गडबडीने बोलताना चुकीचा शब्द जाण्याचा अथवा गैरसमज होण्याचा प्रश्न निर्माण होईल, त्यासाठी मी त्यांना थोडा वेळ मागत आहे. इंग्रजी भाषेत स्पष्ट बोलणे पालकांना जमत नाही, त्यामुळे कम्युनिकेशन प्राब्लेम होत आहे.
पालकांच्या मतानुसार मागच्या वर्षीच फी वाढ केली असून यावेळी पुन्हा फी वाढ केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या वह्यापुस्तकांच्या कितीवर स्टीकर्स चिकटवून जादा रक्कम आकारल जाते. पालक समिती पुन्हा नव्याने गठीत करावी, शेवटी पालकांनी आग्रही भूमिका ठेवून कोणतीही फी वाढ केली जाणार नाही, असे लेखी देण्यास भाग पाडले.