कळंब :- जिल्‍ह्याचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्‍यावतीने कळंब तालुक्‍यातील 42 गावामध्‍ये 2 हजार लीटर क्षमतेचे सिन्‍टॅक्‍स टाकी व पशुधानाच्‍या पाण्‍याची सोय व्‍हावी, यासाठी दोन हौदाचे वाटप सोमवार दि. 22 एप्रिल रोजी करण्‍यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ कळंब येथे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
      पाण्‍याची गळती कमी व्‍हावी, वीज नसताना पाणी सावठण करण्‍याकरीता उपयोग व्‍हावा, यासाठी टँकर चालू असलेल्‍या गावांना प्राधान्‍याने या टाक्‍याचे वाटप करण्‍यात आले. सोमवारी 42 गावातील संबंधिताकडे आ. पाटील यांच्‍या हस्‍ते या टाक्‍यांचे वितरण करण्‍यात आले. खा.डॉ. पद्मसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे हे या उपक्रमासाठी एक कोटी रुपये खर्च करणार आहेत. ज्‍या गावाला टाक्‍या दिल्‍या आहेत. तेथील कार्यकर्त्‍यांनी टाक्‍यांची काळजी घेऊन टंचाई संपल्‍यावर गावातील शाळा, आरोग्‍य केंद्र, अंगणवाडी यांच्‍याकडे या टाक्‍या सोपवायचे असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे.
      उस्‍मानाबाद जिल्‍ह्यामध्‍ये 500 हौद देण्‍यासाठी आ. पाटील प्रयत्‍नशिल असून यासाठीची आर्थिक तरतुद आ. पाटील यांनी जिल्‍हापरिषदेच्‍या मुख्‍याधिका-यांना सुचना दिल्‍या आहेत, अशी माहिती कळंब तालुकाध्‍यक्ष रामहरी शिंदे यांनी दिली आहे.
 
Top