
महाराष्ट्र शासनाने यासाठी केन्द्राकडे प्रस्ताव पाठविला होता. केन्द्रीय पर्यटनमंत्री श्री.के.चिरंजीवी यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली असून या ठिकाणच्या कामाला सुरुवात करण्यासाठी 4 कोटी 38 लाख रुपयांचा पहिला हप्ता निर्गमित केला आहे.
राज्य शासन यासाठी मोफत जमीन उपलब्ध करुन देईल. या कामावर देखरेख करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल.