उस्मानाबाद :- कमांडंट, महासैनिक ट्रेनिंग सेंटर, कोल्हापूर यांच्या वतीने 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी टेक्नीकल व क्‍लार्क पदाकरीता दोन वर्षाच्या निवासी प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूरमध्ये कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता  11 वीच्या विज्ञान शाखेत प्रवेश  दिला जाईल. पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषय घेऊन 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छुणा-या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा. मेस्कोद्वारा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथील महासैनिक प्रशिक्षण केंद्रात निवास व भोजन व्यवस्था केली जाते. इयत्ता 11 वी 12 वी च्या अभ्यासक्रमाबाबत तांत्रिक शाखेसाठी लागणारे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणामध्ये शारिरीक व लेखी परीक्षेची तयारी करुन घेतली जाईल.प्रशिक्षण कालावधी दोन वर्षाचा  राहिल.
         हा कोर्स दिनांक 1 जुलै 2013 पासून सुरु होत आहे. तरी जिल्हयातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी  जास्तीत जास्त संख्येने प्रवेश घ्यावा, असे अवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र 0231-2663132 यावर संपर्क साधावा
 
Top