
येथील हातलादेवीच्या पायथ्याशी असलेल्या साठवण तलावातील खानापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिर व त्या विहिरीमध्ये येणारे उजनीचे पाणी व तेथून शहराला पंपाद्वारे (बुस्टर) होणारा पाणी पुरवठा या कामाची पाहणी करतांना तेथील अडचणी जाणून घेतल्या. शहराला पाणीपुरवठयाबाबत कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता तात्काळ घ्यावी व लवकरात लवकर पाणी कसे मिळेल यासाठी त्यांनी संबंधांना सूचना दिल्या.
पाहणीनंतर जिल्हाधिकारी डॉ.एम.नागरगोजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत आढावा घेतला. यावेळी आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.