बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शहरातील मध्यवस्तीत असलेल्या पुरातन व ऐतिहासिक ऐनापूर मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विद्युत दिपोत्सव, रोषणाई, रंगरंगोटी, महापूजा, महाप्रसाद इत्यादीचे आयोजन करुन उत्सव साजरा करण्यात आला.
प्रत्येक वर्षी बार्शी शहरातील प्रमुख दात्यांकडून ऐच्छिक वर्गणी गोळा करुन जयंती उत्सव साजरा केला जातो. सदरच्या जागेवर कागदोपत्री पंच कमिटी असली तरी देखील त्यांच्याकडून वर्षभरात मंदिराच्या देखभालीसाठी कसल्याही प्रकारचे नियोजन होत नाही. याची जागा काही जणांना भाडयाने दिली असून त्याचे उत्पन्न किती व त्याचे काय केले जाते, हे मात्र आजपर्यंत कोणालाच समजले नाही.
सदरच्या मंदिरात यापूर्वीच गाभा-यात दुकानाचे गाळे तयार करुन भाड्याने देऊन त्याचे उत्पन्न पंचकमिटीच्या काही सदस्यांनी घेण्याची धडपड सुरु केली होती. परंतु गावातील प्रतिष्ठीत समाजसेवकांनी तो प्रकार हाणून पाडला व पूर्वी गुपचूप जागांची विल्हेवाट लावून राहिलेल्या जागेपैकी ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा प्रयत्न केला. सदरच्या मंदिराला शासनाने ताब्यात घेण्याची गरज आहे. या ठिकाणी हनुमानाची सुमारे साडेतीन फुट उंचीची पुरातन उभी मूर्ती असून शेजारी शंकराची पिंड, श्री गणेश, नागन्नाथ इत्यादीची मूर्ती आहेत.
सदरच्या मंदिराचे बांधकाम दगडी कोरीव असून गाभा-यात जुन्या वृक्षांचे मोठे खांब आहेत. गाभा-यात संगमरवरी फरशीचे डिझाईन असून या ठिकाणी आजपर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रम झाले आहेत. ऐनापूरे यांच्या नावाने या मंदिराचे नाव ऐनापूर मारुती असे पडल्याचा काहीजण सांगत आहेत. गावातील गरीब गरजू, हमाल, कष्टकरी लोक या ठिकाणचा आश्रय घेतात. उन्हाळ्यात दिवसभर बाहेरगावचे वाटसरु व गावातील काही वृध्द या ठिकाणी थोड्या वेळाची विश्रांती घेण्यासाठी गर्दी करतात. सदरच्या हनुमानाच्या मंदिरात पूजा, पाठ, धार्मिक कार्यक्रम इत्यादीसाठी आलेल्या नागरिकांना मनाई करण्याचा देखील प्रयत्न पचं कमिटीच्या काहीजणांनी केल्याची चर्चा सुरु होती. परंतु सदरचे मंदिर हे कोणा एकाचे नसून ते सार्वजनिक आहे. सदरच्या ठिकाणी शासनाने लक्ष घालून प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा जे मंदिराची जागा विकून खाणार नाहीत, त्यांच्याकडे अथवा शासनाच्या मालकीत ठेवणे गरजेचे आहे.