कळंब -: शहर व परिसरात शनिवार दि. 27 एप्रिल रोजी पहाटे दोन वाजल्यावासून जोरदार वादळी वारे व वीजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामध्ये तालुक्यातील हासेगाव (केज), हावरगाव, ईटकूर, तांदुळवाडी, सात्रा, खोंदला आदी गावाच्या शिवारातील झाडे उन्मळून पडली. तर काहीचे पत्र्याचे शेड व त्यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेली.
कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) शिवारातील गट नं. 77 मधील असलेल्या विजयकुमार हरिभाऊ यादव यांच्या गोठ्यावर पहाटे चार वाजता अचानक वीज कोसळली. यामध्ये गोठ्यात बांधलेली दोन गायी व दोन वासरे जागीच ठार झाली असून गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. यामध्ये दीड लाख रुपयेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबतची नोंद कळंब पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून अधिक पो.हे.कॉ. दिपक गोलेकर हे करीत आहेत.