कळंब -: तालुक्यातील मौजे शेळका धानोरा येथील शहाजी मच्छिंद्र पवार (वय 57) यांचा दारुच्या नशेमध्ये कन्हेरीच्या बिया खाऊन मृत्यू झाला आहे. याबाबत सुभाष शहाजी पवार (रा. शेळका आनोरा, ता. कळंब) यांच्या फिर्यादीवरुन कळंब पोलीस स्टेशनमध्ये आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक कदम हे करीत आहेत.