उस्मानाबाद -: सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा प्रमुखांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 तयार करण्यात आला असून त्‍या अनुषंगाने इयत्ता 10 वी च्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. दहावी पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून होणार आहे. इयत्ता दहावीची  मार्च -2014 ची प्रथम परीक्षा एकुण 600 गुणांची राहील. सर्व विषयांचे प्रश्नपत्रिका आराखडे डिसेंबर-2012,जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च,2013 च्या शिक्षण संक्रमण अंकात पहावयास मिळतील. पुर्नरचित अभ्यासक्रमाबाबतचे परिपत्रक सर्व शाळा प्रमुखांना पाठविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.           
 
Top