उस्मानाबाद -: गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनाची मोठया प्रमाणात खरेदी विक्री होत असते. या पार्श्वभुमीवर नागरीकांच्या सोयीसाठी येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गुरुवार, दि.11 एप्रिल रोजी सुरु राहणार आहे. वाहन नोंदणी व त्याअनुषंगाने करवसूलीच्या कामकाजासाठी हे कार्यालय सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे. सर्व नागरीकांनी याची नोंद घ्यावी आणि नवीन वाहन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. म्हेत्रेवार यांनी केले आहे.