![]() |
डॉ. सुमंगल देशपांडे |
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : श्री श्री जगदगुरु शंकराचार्य महासंस्थान श्रीशारदापीठ शृंगेरी (कर्नाटक) यांनी बार्शी येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुमंगल रामचंद्र देशपांडे यांना त्यांनी केलेल्या श्रीमत भगवत गीता प्रचार कार्याबद्दल त्यांची शृंगेरी श्री शारदा पीठ कर्नाटक या मठाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. त्यांनी गेली दहा वर्षे सातत्याने सुमारे पन्नास विद्यार्थ्यांकडून श्रीमदभगवत गीता अध्याय पाठांतर करुन घेतले आहे. या कार्याबद्दल त्यांचा गौरव व कौतुक केले असून भविष्यात त्यांच्याकडून अशाच प्रकारचे सेवाकार्य घडून श्रीमदभगवत गीतेचा प्रसादर व्हावा, या उद्देशाने त्यांना गीता पाठांतर करणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे अधिकारी पत्र पाठवून दिले आहेत. या गीतेच्या पाठांतर व प्रसार कामात जगदगुरु शंकराचार्य शारदापीठ शृंगेरी यांनी त्यांना आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत.