बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : दुष्काळाची तीव्रता वरचेवर वाढत असल्याने उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने पाण्याच्या टाक्या वितरीत करण्यात आल्या. ज्या दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याच्या साठवण क्षमतेची गरज आहे. त्याकरीता 500 लीटर ते 5000 लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या आ. दिलीप सोपल यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.
यावेळी आ. दिलीप सोपल बोलताना म्हणाले की, शेतक-यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कटिबध्द असून पिण्याच्या पाण्याची अत्यावश्यकता व साठवण क्षमतेची गरज लक्षात घेत मार्केट कमिटीच्यावतीने तातडीने टाक्यांचे वितरण केल्याचे सांगितले. जनावरांच्या चा-याचा प्रश्न, दुष्काळामुळे फळबागा जळण्याच्या मार्गावर असताना अनुदानाचा प्रश्न, इत्यादीबाबत ठोस उपाययोजना करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत अत्यंत सचोटिने धोरणे राबवित, व्यापारी व शेतक-याचे हित जोपासण्याचे काम सातत्याने केल्यानेच कृषी उत्पन्न बाजार समिती चढत्या क्रमाने अगक्रमात आहे. विश्वासर्हतेने व्यापार वाढला असून काहीजण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करत असले तरीही व्यापारी व शेतक-यांच्या विश्वास कधीही मिळणार नाही. यापुढे आणखी चांगल्या सुविधा व्यापारी व शेतक-यांना देऊन मोठ्याप्रमाणात व्यवसाय वाढीची धोरणे राबवू असेही त्यांनी सांगितले.
यावेळी झाडी, झरेगाव, कापसी, जामगाव पा., सावरगाव, पिंपरी, तांबेवाडी, लमाणतांडा, भातंबरे, मुंगशी वाळूज, मानेगाव, काळेगाव, इर्ले, ढोराळे, तडवळे, देवगाव, नारी, नारीवाडी, पिंपरी सा, चिखर्डे, बावी, नांदणी, लाडोळे, शेंदरी, हिंगणी आदी भागासाठी पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या. आणखी गरज भासल्यास प्रत्येक गावात टाक्या देण्यात येतील असेही यावेळी सांगितले. याप्रसंगी मार्केट कमिटीचे कुंडलिक गायकवाड, तानाजी बापू मांगडे, अरुण कापसे, नागेश अक्कलकोटे, ओव्हाळ, बप्पा काशीद आदीजण उपस्थित होते.