बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : पानगाव (ता. बार्शी) येथे संत बाळूमामाच्या यात्रेचे आयोजन केल्याची माहिती समिती व देवस्थानचे विश्वस्त बाबासाहेब कापसे यांनी दिली.
या कार्यक्रम सोहळ्यात पालखी मिरवणूक, नित्य आरती, जागर, भारुड, ओव्या, गजेढोल, ओला भंडारा पंचमी व दि. 3 मे रोजी सकाळी दहा वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या मिरवणुकीत घोडयाची नृत्य कसरती स्पर्धा होणार आहे. या कार्यक्रमाचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे नागनाथ गाडेकर, राजुदेव आवारे यांनी केले आहे.