बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : आपण होमिओपॅथीचा अभ्यास करतो, प्रॅक्टीस करतो, इतरांना मार्गदर्शन करुन त्याचे शिक्षण देतो. परंतू दुर्देवाने अँलोपॅथीच्या उपचारासाठी परवानगी मिळविण्यासाठी धडपडत करीत असल्याने याला आपल्यामधील आत्मविश्वास कमी असल्यासारखे वाटत आहे, असे मत डॉ. अरुण भस्मे यांनी व्यक्त केले.
बार्शीतील स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या दुस-या राज्यस्तरीय होमिऑपॅथीक परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष आ. दिलीप सोपल, सोलापूर जिल्हा होमिओपॅथीक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड, उद्योगपती राजेंद्र मिरगणे, डॉ.बी.वाय. यादव, डॉ. श्रीहरी घोलप, डॉ. कालिदास लिमकर, डॉ. सुनिल वरळे, डॉ. सुहास राऊत, डॉ. आरिफ शेख, डॉ. वाघमोडे, डॉ. देविदास इंगळे, डॉ. आनंद बलदोटा, डॉ. बिनवडे, डॉ. अनिल कांबळे, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. गिरीश धडपडे, डॉ. दिपक जगताप आदीजण उपस्थित होते.
यावेळी हैद्राबाद येथील डॉ. चंद्रशेखर राव, ठाणे येथील डॉ. मिलिंद राव, मुंबई येथील डॉ. कृष्णकुमार दिंडे, ठाणे येथील डॉ. मयुरेश महाजन, पुणे येथील डॉ. दिपक जगताप यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केले. सेव्ह वॉटर अर्थ या मुख्य हेतू असलेल्या माईंड मेड इजी अ अप्लाईड माईंड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
पुढे बोलताना डॉ.भस्मे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांची शाखा ख-या अर्थाने विकास व होमिओपॅथी उपचाराच्या प्रचाराचे काम करत आहे. कोण म्हणत असेल लवकर रोगी बरा होत नाही. परंतु अँलोपेथीऐवजी होमिओपॅथीच्या उपचाराने योग्य मात्र्यामध्ये औषधे दिल्यास त्वरीत परिणाम दिसून येतात. अँलोपॅथीच्या साईड इफेक्टसमुळे रोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, याचा अभ्यास करण्यासाठी तसेच त्यांना कोणत्या मात्रामध्ये होमिओपॅथीचे कोणते औषध देणे गरजेचे आहे. यासाठी माजविघातक कृत्ये केल्यास त्यांना सोडवायला कोणी पुढे येऊ नये. कोणत्याही राजकीय व्यक्तींना होमिओपॅथीच्या डॉक्टरांच्या प्रश्नासाठी वेळ नाही. कुणाला कशाचे काही देणे-घेणे नाही. हे लोक काही करु शकणार नाही. त्यासाठी आपण आता आमरण उपोषणाला बसण्याचा विचार करीत आहोत. होमिओपॅथीसाठी तर राज्ये व देशांत स्वतंत्र अभ्यासाचे विभाग असून महाराष्ट्रात याउलट चित्र दिसते. आपण आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे, असे म्हणूवन घेतो. परंतु त्यामध्ये विविध प्रकारच्या नागरिकांच्या सुविधेकडे कटाक्षाने दुर्लक्ष करतो, ही शोकांतिका आहे.
यावेळी आ. दिलीप सोपल, डॉ. लिमकर, राजेंद्र मिरगणे यांनी विचार मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व डॉक्टरांनी एकजुटीने काम करीत प्रयत्न केले.