नवी दिल्ली -: येथील अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थिनीनी जीपीएस सिस्टीमच्या सहाय्याने बलात्काराविरोधी अंडरवेअर तयार केली आहे. या अंडरवेअरमुळे लैंगिक अत्याचार करणा-या ३८०० केव्हीचा जोरदार शॉक तर बसणार आहेच शिवाय या माध्यमातून पोलिसांनाही सतर्क होण्यास मदत होणार आहे. या अंडरवेअरमुळे महिलांचे केवळ संरक्षणच होणार आहे, असे नव्हे. तर संबंधित गुन्हेगारास तात्काळ शिक्षा करणेही शक्य होणार आहे, असे या विद्यार्थिनीपैकी एक रिंपी त्रिपाठी हिने सांगितले.